![]() |
Click Here to watch |
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा – श्री. दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, महाल, नागपूर
दिनांक २१ जून २०२५ रोजी श्री. दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, महाल, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व जोशात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली त्या संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी यावलकर यांची. त्यांच्यासोबत पर्यवेक्षिका सौ. पंचभाई , तसेच हायस्कूल प्रमुख सौ. कीर्ती बल्की ह्या देखील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध उपस्थितीने झाली. ‘योगदिन’ या विषयावर माहिती देत उपस्थितांना योगाचे महत्त्व सांगण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे सादरीकरण केले.
मुख्याध्यापिका सौ. माधुरी यावलकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा करता येतो, हे समजावून सांगितले. त्यांनी सर्वांना दररोज योग करण्याचा संकल्पही करवून घेतला. सौ. पंचभाई आणि सौ. कीर्ती बल्की यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून योग साधनेचे महत्त्व पटवून दिले.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन योग साधना केली. संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने भारलेले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
international yoga daya
0 Comments