रक्षाबंधन
रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय सण आहे. शालेय स्तरावरून देखील या सणाची दखल घेतली जात आहे. यांत्रिक युगात जगत असताना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा जास्त वापर होत असल्यामुळे नैतिकता कुठेतरी ढासळत चाललेली आहे, त्यामुळे समाजातून तसेच शैक्षणिक संस्थांमधून आता नैतिक मूल्यांची जपणूक करणारे शिक्षण देणारे कार्यक्रम घेण्याची गरज भासू लागली आहे.
जे जे क्षेत्र आपले रक्षणकर्ते आहे , त्या क्षेत्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी या क्षेत्रात कार्य करीत असणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून रक्षाबंधनाचा कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित केला जातो.
रक्षाबंधन म्हणजे सर्वांच्या दृष्टीने भाऊ बहिणीची रक्षा करतो , एवढाच त्याचा अर्थ नसून त्यामागील दृष्टीकोन किती व्यापक आहे याची जाणीव शालेय स्तरावरून करून दिली जाते. रक्षा आणि बंधन हे दोन्ही शब्द एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटल्यास वावगे होणार नाही. "रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे मर्यादा". प्रत्येक वेळेस भावानेच बहिणीचे रक्षण करणे एवढा मर्यादित अर्थ नाही. आज आपण स्त्री-पुरुष समानता या युगात जगत आहोत. God helps those who help themselves. या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे रक्षण स्वतः केलेच पाहिजे.
समाजातील प्रत्येक घटक रक्षाबंधनास पात्र आहे. पोलीस खाते, वैद्यकीय खाते, सफाई कामगार, वृक्षवल्ली इ. पोलीस खाते हे सर्वांच्या रक्षणासाठी तत्पर असतात पण त्याआधी रक्षाबंधनाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे .बंधनात राहिल्यास रक्षण हे होईलच परंतू मर्यादांचे पालन करणे हे समाजातील प्रत्येक नागरिकांचे नैतिक कर्तव्य आहे .मर्यादा म्हणजे ओझे नाही .वाईट गोष्टी होऊ नये ,घडू नये त्यासाठी स्वतःला लावून घेतलेले चांगले नियम. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सहकारी आपल्याला सेवा द्यायला तयार असतातच, पण ... कुठेतरी आम्ही राहणीमान, खाणपानात चुकत असतो. चांगल्या सवयी ठेवा, आरोग्याची योग्य ती काळजी घ्या यासाठी त्यांचा आग्रह असतो. सफाई कामगार आपल्या परीने परिसर कसा स्वच्छ व निरोगी राहील यासाठी कार्यरत असतात पण यासाठी आपण बंधनात असलो पाहिजे, त्यासाठी आपल्या सवयींना चांगल्या सवयींमध्ये परिवर्तित केले पाहिजे. वृक्ष देखील नैसर्गिक वडीलधारी मंडळी म्हटल्यास हरकत नाही. त्यांच्यापासून आपल्याला फळे फुलांपासून तर औषधी इत्यादी जीवन उपयोगी वस्तूंची मदत होत असते. ते आपल्याला परोपकाराची शिकवण देत असतात, त्यांना राख्या बांधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही नैतिकता आपल्याला शाळास्तरावरून मिळत असते.जर आपण या सर्व गोष्टींचा अवलंब योग्य रीतीने केला तर खऱ्या अर्थाने आपण रक्षाबंधन साजरा करतोय आणि आपल्याला त्याचा प्रमुख्याने अर्थ समजला असे म्हटले जाऊ शकते .
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
Article by Smt .Balki Madam
#rakshabandhan #rakhi #rakshabandhanspecial #brothersisterlove #rakhispecial #love #rakhigifts #brother #sister #rakshabandhangifts #instagram #rakhihampers #india #festival #happyrakshabandhan #rakhicelebration #sisterlove #handmade #rakhidesigns #trending #siblings #gift #instagood #handmaderakhi #rakhicollection #gifts #rakhifestival #family #brothers #bro
0 Comments