UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

मराठी भाषा गौरव दिन

 

Click here to watch 


मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा ...27/02/2026

श्री डी डी नगर हायस्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी यावलकर व हायस्कूल इन्चार्ज श्रीमती कीर्ती बल्की  या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. प्रास्ताविक श्रीमती बलकी मॅडम ,हायस्कूल इन्चार्ज यांनी केले. त्यांनी मराठी भाषेचे वैभव, समृद्ध परंपरा आणि आजच्या काळातील तिचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी यावलकर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात शुद्ध व प्रभावी मराठीचा वापर करावा, असे आवाहन केले. मराठी ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना एक सुंदर मराठी चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपटातून विद्यार्थ्यांना भाषेची गोडी व संस्कृतीची जाणीव झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री नायडू सर व कराडे सर यांचा सक्रिय सहभाग होता.

संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री गोमासे सर यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून मराठी भाषेबद्दल अभिमान व आत्मीयता निर्माण करणारा ठरला.

Post a Comment

0 Comments